पोलीस भरती नविन GR | Police Bharti Latest Update | Police Bharti 2024

 पोलीस भरती बाबतीत अतिशय महत्त्वाची माहिती पहा

मित्रांनो पोलिस भरतीच्या जाहिरातीनंतर दहा दिवसांनी का होईना राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. बघा आता यामुळे आता मराठा उमेदवारांना एसईबीसी व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंतच असल्याने या प्रमाणपत्रासाठी मराठा उमेदवारांची तारांबळ उडणार आहे.

मित्रांनो पोलिस भरतीतील मराठा आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने, 'मराठा आरक्षणासंदर्भातील नोकरभरती किंवा दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील', असा नुकताच इशारा दिला आहे. पहा याने संभ्रमात पडलेल्या मराठा उमेदवारांकरिता राज्य सरकारने खुलासा करणे अपेक्षित आहे. मित्रांनो तसेच मराठा उमेदवार एसईबीसी किंवा ईडब्लूएस (आर्थिक मागास घटक) या दोन्हीतूनही लाभ घेऊ शकतो का, याबाबत भरती यंत्रणेने स्पष्ट मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

Previous Post Next Post