राज्यसरकारने यावेळी पोलिस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवाराला कोणत्याही एका घटकात केवळ एक अर्ज करता येणार आहे. याआधी वेगवेगळ्या घटकात (जिल्ह्यासाठी) अर्ज दाखल करून दोन-तीन शारीरिक चाचण्या देता येत होत्या. प्रत्येक उमेदवाराचे आधारकार्ड लिंक केल्याने आता तशा संधी संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक घटक निवडावा लागणार आहे.
एकूण १७४३० पदासाठीच्या पोलिस भरतीत पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी सव्वीस घटकांत ९५९५ जागा, राज्य राखीव पोलिस दलातील पदासाठी एकोणीस घटकांमध्ये ४३४९ जागा, चालक पदासाठी सव्वीस घटकांमध्ये १६८६ जागा तर कारागृह पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत. पोलिस भरतीसाठी ५ मार्च ते ३१ मार्च ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना पोलिस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ, चालक, कारागृह व बँडचालक अशा पाच पदांसाठी पात्र उमेदवार पाचही ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र एका पदासाठी कोणताही एकच घटक निवडावा लागणार आहे. उदा. कॉन्स्टेबल पदाकरिताच्या २६ घटकांपैकी कोणत्याही एकाच घटकात अर्ज करता येईल. दुसऱ्या घटकांत अर्ज करू लागला तर आधीच्या अर्जासोबत आधार लिंक असल्याने दुसरा अर्ज स्वीकारला जात नाही. शारीरिक चाचण्या वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी लेखी परीक्षा राज्यभर एकाच वेळी घेतली जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट केले आहे. आजारी पडणे, गोळाफेक फसणे, धावताना जायबंदी होणे, मासिक पाळी अशा कारणांनी संधी हुकलेल्यांना आता पूर्वीप्रमाणे दुसरी संधी मिळणार नाही. यानिमित्ताने यंत्रणेवरील ताण कमी होऊन संख्या फुगणार नाही असेही मत व्यक्त केले जात आहे.
पाच पदांपैकी कॉन्स्टेबल, कारागृह या दोन पदांसाठी पात्रता समान असल्याने सरसकट उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणे दुसरी संधी मिळणार नाही. यानिमित्ताने यंत्रणेवरील ताण कमी होऊन संख्या फुगणार नाही असेही मत व्यक्त केले जात आहे.
पाच पदांपैकी कॉन्स्टेबल, कारागृह या दोन पदांसाठी पात्रता समान असल्याने सरसकट उमेदवारांना
आता आपल्या प्रवर्गासाठी कोणत्या घटकात किती जागा आहेत याचा अभ्यास करून आणि आपली गुणप्राप्तीची क्षमता बघून काळजीपूर्वक घटक निवडावा. मुंबई, गडचिरोली आणि पुणे घटकांत सर्वाधिक जागा आहेत. 'एसआरपीएफ'मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी जागा आहेत.