विनंती अर्जदार- पोलिस भरती प्रक्रियेतील सर्व अर्जदार | police bharti





 विनंती अर्ज

प्रति

मा देवेंद्रजी फडणवीस साहेब

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य

मंत्रालय,मुंबई.


विनंती अर्जदार- पोलिस भरती प्रक्रियेतील सर्व अर्जदार


विषय =पोलीस भरती प्रक्रिया 2024 पावसाळयात न घेण्याबाबत.


 *महोदय*

उपरोक्त विषयास अनुसरून विनंती पुर्वक अर्ज करतो की आपल्या महाराष्ट्र राज्य गृह विभागामध्ये आपण 2024 या गत वर्षात *पोलीस शिपाई* या पंदाची 17 हजार पेक्षा जास्त जागा ची तरुणांना संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबाबत आपले विशेष आभार..


मात्र या वेळी *पोलीस भरती* प्रक्रिया *मैदानी चाचणी आणि पावसाळा* हा कालावधी एकत्रच असल्याने

*पोलीस भरती* देणारे बरेच उमेदवार ग्रामीण भागातून *मैदानी चाचणी* साठी एक दिवस आधीच येत असतात पावसामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होऊ शकते किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे उमेदवाराची तारांबळ उडू शकते आणि याचा परिणाम सर्व उमेदवारांच्या *मैदानी चाचणी* वर दिसून येईल..

काही उमेदवार मोटारसायकल दूरवरुन येत असतात *पावसाळ्यात अपघाताचे* प्रमाण जास्त असते.

सर्वच जिल्ह्य़ात मैदानी चाचणीसाठी मैदाने तयार करण्याचे काम चालु आहेत ,काही जिल्ह्य़ात मॅटवर (synthetic ground) मैदानी चाचणी घेणे नियोजन चालु आहे, पण राज्यातील काहीच जिल्ह्य़ात अशी  मैदान उपलब्ध आहेत, त्यामुळे बाकि जिल्ह्य़ात मातीच्याच मैदानावर मैदानी चाचणी घ्यावी लागेल, त्यामुळे तेथील उमेदवारांना पावसामुळे अनेक अडचणींना समोर जावे लागेल.

या सर्व परिस्तिथी मुळे काही जिल्ह्य़ातील मैदानी चाचणी अपुर्ण राहु शकते, व त्यामुळे सर्व जिल्ह्य़ाची एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात देखील अडथळा येउ शकतो , कारण सर्व जिल्ह्य़ाची मैदानी चाचणी झाल्या शिवाय लेखी परीक्षा घेता येणार नाही.

त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून *पोलीस भरती* करणाऱ्या उमेदवाराला मैदानी चाचणीसाठी येण्या करीता कोणत्याही *नैसर्गिक आपत्तीचा सामना* करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी..

मागच्या वेळी *मुबंई पोलिस भरती* वेळी जो अवकाळी पाऊस झाला त्या मध्ये खूप मुलामुलींना मोठया प्रमाणात *अडीअडचनीना* सामोरे जावे लागले.

यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरती  मैदानी चाचणी काही *कालावधी* साठी पुढे ढकलण्यात यावी , ही आपणास नम्र विनंती 🙏

आपले विश्वासू,,

पोलीस भरती करणारे सर्व उमेदवार (महाराष्ट्र राज्य)

सोबत प्रत.

मा एकनाथ जी शिंदे साहेब

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मा अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

*sir*

 In accordance with the above subject, I would like to request in advance that in our Maharashtra State Home Department, we have provided an opportunity to the youth of more than 17 thousand posts of *Police Constable* in the last year 2024.

 But this time because *police recruitment* process *field test and rainy season* are the same period

 Many candidates for *Police Recruitment* come from rural areas a day in advance for *Field Test* Rain may inconvenience their stay or cause problems so the candidate may get flustered and this effect will be reflected in *Field Test* of all candidates..

 Some of the candidates come from far away on motorbikes.

 In all the districts, the work of preparing the ground for the field test is going on, in some districts planning is going on to conduct the field test on mat (synthetic ground), but in some districts of the state such fields are available, so in the rest of the districts the field test will have to be conducted on the clay ground, so the candidates there will face many difficulties due to rain. You have to go to the front.

 Due to all these circumstances, the field test in some districts may remain incomplete, and it may also hinder the conduct of the written examination of all the districts on the same day, because the written examination cannot be conducted without the field test of all the districts.

 So considering all these aspects *police


Previous Post Next Post